मुंबई – प्रसिद्ध चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा (Vidhu vinod chopra) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला बारावी फेल (12th fail) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात विक्रांत मेस्सी (Vikrant messy) आणि मेधा शंकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने भारतातच नव्हे, तर जगभरातही चांगली कमाई केली. आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
12 वी फेल चित्रपटाला २०२४ मधील ऑस्करच्या (12th fail oscar race) शर्यतीत नामांकन मिळाले आहे. याबाबतची माहिती अभिनेता विक्रांत मेस्सीकडून देण्यात आली आहे. प्रमोशन न करता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित करण्यात आला होता. तर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामुळे हा चित्रपट खूप कमी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु, या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता सर्वच या स्तरांतून या चित्रपटाचे कौतुक होत आहे. (Bollywood movie in oscar)
भावनिक असलेल्या हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. आता ऑस्करच्या शर्यतीत समावेश झाल्याने या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
12 वी फेल हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी स्वतंत्र नामांकन देण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विक्रांतने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत आता या चित्रपटाचा समावेश झाल्याने सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
12 वी फेल हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल यावर आमचा विश्वास होता. पण प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद ही आमच्यासाठी नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. अनेक प्रेक्षक दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा हा चित्रपट पाहायला येत आहेत. प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नको आहे तर उत्तम कथानकही हवे आहे हे यावरुन सिद्ध झाले आहे.असं मत अभिनेता विक्रांत मेस्सी याने व्यक्त केलं.