करोनामूक्‍त संख्येचा 5 लाखांचा टप्पा पार

पुणे विभागातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 94.40 टक्‍के; विभागात 14 हजार 797 बाधितांवर उपचार सुरू

 

पुणे – विभागातील करोनामुक्‍तीच्या संख्येने शुक्रवारी पाच लाखांचा टप्पा पार केला. बाधित संख्येच्या तुलनेत या आजारातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या करोनामुक्‍तीचे प्रमाण 94.40 टक्‍के आहे. तर, 14 हजार 797 बाधितांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

पुणे विभागातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 30 हजार 983 इतकी आहे. त्यामध्ये आतापर्यंत 5 लाख 1 हजार 266 बाधित करोनामुक्‍त झाले आहेत. बाधितांमधील 14 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून, विभागात मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्‍के आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एकूण 3 लाख 39 हजार 562 बाधितांपैकी 3 लाख 20 हजार 418 रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यातही करोनामुक्‍तीचे प्रमाण 94.36 टक्‍के आहे. शहरात 10 हजार 883 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एकूण 8 हजार 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.