शिवभोजन थाळी 31 मार्चपर्यंत 5 रुपयात

गरीब आणि गरजू व्यक्‍तींना होणार फायदा

पुणे – करोना प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाअभावी हाल होत असल्याने राज्य शासनाने दि. 30 मार्च 2020 पासून शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांऐवजी पाच रुपये केली होती.

त्यास शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे गरीब आणि गरजू व्यक्‍तींना याचा फायदा होणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रोज सरासरी 2 हजार 900 नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण मिळत असून 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 100 ग्रॅम 1 वाटी वरण व 150 ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.