Record of sixes broken in IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17व्या हंगामात अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला गेला. या मोसमात आतापर्यंत गोलंदाजांची चांगलीच धुलाई झालेली पाहायला मिळाली आहे, त्यामुळे 2 सामन्यांमध्ये संघाची 250 पेक्षा जास्त धावसंख्याही दिसून आली आहे.
गुजरात आणि पंजाब यांच्यातील सामन्यात, स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी सामन्यांमध्ये 300 षटकारांचा आकडा पार झाला आहे. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलने पंजाबविरुद्धच्या सामन्यात डावाच्या पहिल्याच षटकात षटकार लगावताच त्याने आयपीएलच्या या मोसमात षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले.
3773 चेंडूत 300 षटकार पूर्ण ….
आयपीएल 2024 मध्ये 300 षटकारांचा आकडा गाठण्यासाठी केवळ 3773 चेंडू लागले, जे या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात वेगवान आहे. आयपीएलमध्ये षटकारांचा हा आकडा 4000 पेक्षा कमी चेंडूंमध्ये पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात, 4578 चेंडूंमध्ये 300 षटकारांचा आकडा पूर्ण झाला होता, जो गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब यांच्यातील सामन्यात 6 वर्षांनंतर खंडित झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या हंगामात खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्येच एकूण 67 षटकार मारले गेले.
IPL इतिहासात 17 सामन्यापर्यंत सर्वाधिक षटकार….
IPL 2024 : 312 षटकार
IPL 2023 : 259 षटकार
IPL 2020 : 258 षटकार
IPL 2018 : 245 षटकार
IPL 2022 : 245 षटकार
आयपीएलच्या शेवटच्या मोसमात 17 सामन्यांमध्ये मारलेल्या षटकारांचे आकडे बघितले तर, त्यावेळी फक्त 259 षटकार मारले गेले होते, तर 2020 मध्ये, त्याच संख्येच्या सामन्यांमध्ये एकूण 258 षटकार मारले गेले होते. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 312 षटकार मारले गेले आहेत.