मुंबई – पेटीएम पेमेंट बॅंकेने ग्राहकाची माहिती घेण्यासंदर्भात आणि इतर नियमांची व्यवस्थित अंमलबजावणी न केल्याबद्दल रिझर्व बॅंकेने 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकांची केवायसी मोबाईल बॅंकिंग आपलिकेशन सायबर सिक्युरिटी या संदर्भात रिझर्व बॅंकेने जे मानदंड जाहीर केले आहेत याची पूर्तता न केल्याबद्दल हा दंड करण्यात आला असल्याचे रिझर्व बॅंकेने म्हटले आहे.
रिझर्व बॅंकेने नेमलेल्या काही संस्थांनी या संदर्भात तपासणी केली असता यात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. यासंदर्भात रिझर्व बॅंकेने पेटीएम पेमेंट बॅंकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या नोटिसीचे उत्तर बॅंकेकडून आले मात्र या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे या बॅंकेला दंड करण्यात आला असल्याचे रिझर्व बॅंकेने स्पष्ट केले आहे.