पिंपरी – भाजपचे नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज (दि. ९) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी
भाजपाला रामराम ठोकला. दरम्यान, भाजपा सोडणारे बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत. लांडगे आणि नेवाळे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याची शक्यता आहे.