मुंबई – द कपिल शर्मा शोमध्ये सेलेब्स बर्याचदा दिसतात, जिथे खूप धमाल पाहायला मिळते अशात अभिनेत्री रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि सुधा मूर्ती शोच्या आगामी भागात दिसणार आहेत. शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये रवीनाने आधी कपिलची खिल्ली उडवली नंतर कॉमेडियनच्या गालावर किस केले. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
या व्हिडिओमध्ये रवीना टंडन तिच्या जुन्या चित्रपटांबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. ‘अंदाज अपना अपना अपना’ या चित्रपट शूटिंग दरम्यानचे किस्से तिने कपिल सोबत शेअर केले आहे.
कपिल शर्माची चर्चा संपण्याआधीच रवीना गंमती करताना दिसते, ‘आताचे फोटो पाहून तूही असेच बोलला असेल ना?’ रवीनाचे बोलणे ऐकून सर्वजण जोरात हसायला लागतात आणि त्यानंतर रवीना तिच्या जागेवरून उठते कपिल शर्माच्या गालावर किस करते. यावर कपिल म्हणतो, ‘एवढा अपमान करून हे सगळं मिळवायचं असेल तर अजून एक-दोनदा अपमान सहन करील.’ हे ऐकून प्रेक्षक पुन्हा हसले.
कपिल शर्मा छोट्या पडद्यावर तसेच मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावत आहे, परंतु अद्याप त्याचा एकही चित्रपट यशस्वी झालेला नाही. कपिल शर्माचा शेवटचा रिलीज झ्विगाटो होता, ज्यामध्ये त्याने फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका केली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. दुसरीकडे, रवीना टंडन अलीकडेच एचटी स्टायलिश अवॉर्ड्समध्ये अक्षय कुमारसोबत झालेल्या संवादामुळे चर्चेत होती. विशेष म्हणजे रवीना KGF 3 मध्ये दिसणार आहे.