विमान प्रवास महागल्यामुळे पर्यटन, हॉटेल उद्योगांवर परिणाम

नवी दिल्ली – चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी करणाऱ्या हॉटेल व्यवसायाला आता नवीन प्रश्‍न भेडसावत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विमान उद्योगांच्या होत असणारी बिकट वाटचालीमुळे पर्यटन उद्योगाबरोबरच हॉटेल व्यवसायासमोर मोठे संकट निर्माण होत आहे.

कन्सल्टी फर्म एचव्हीएसच्या अहवालातून इंडिया हॉस्पिटॅलिटी उद्योगाबाबतची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.
देशातील हॉटेल व्यावसायिकांनी जागतिक पातळीवर आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. 2018 मध्ये चांगला वाटा मिळविला आहे. तर 2019 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत हॉटेल रुमच्या दरात 11 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे एचव्हीएसने नोंदवले आहे.

मागील दोन वर्षांत हॉटेल व्यवसायात मोठी वाढ झालेली आहे. यात अनेक मार्गानी हा व्यवसाय तेजीत राहिल्याचे अनुमान नोंदवण्यात आले. परंतु या सध्या देशातील विमान कंपन्यांची होत असलेली वाताहत पाहता आगामी काळात याचा फटका हॉटेल व्यवसायांना बसणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर याचा फटका पर्यटन उद्योगालाही बसण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.