मुंबई – ‘पुष्पाः द राईज’ सिनेमा प्रदर्शित झाल्यांतर दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या सर्वत्र याच सिनेमाचा बोलबाला असून, सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रचंड गाजत आहेत. पुष्पा मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’ आणि अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ यांची जोडी प्रेक्षकांना चांगली भावली आहे.
रश्मिका हे नाव कलाक्षेत्रात रुची असलेल्यांसाठी सर्वपरिचत आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळेच रश्मिका टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 2020 मध्ये गुगलबाबाने रश्मिका मंदाना नॅशनल क्रश असल्याचं जाहीर केलं होत. दरम्यान, पुष्पा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर आता तिची गाडी सुसाट वेगाने सुटली आहे.
यातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या अप कॉमिन्ग चित्रपटाची घोषणा केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘एनिमल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत.
या चित्रपटाच्या पॉवरफुल टायटल टीझर आणि चित्रपटाशी निगडीत कलाकारांची नावे समोर आल्यापासून या क्राईम ड्रामा चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे.