मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सध्या रणदीप हुडा मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल असल्याचे समजते. रणदीप हुडा हॉर्स रायडींग करताना अपघात झाला. अचानक बेशुद्ध पडल्याने रणदीपला दुखापत झाल्याचे समजते. यानंतर रणदीपला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी रणदीपला काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रणदीपला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सलमान खानच्या राधे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील रणदीप हुडा जखमी झाला होता.ही दुखापत एवढी मोठी होती की रणदीपला आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
सध्या तो साई कबीरच्या ‘मर्द’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 6 मे रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय तो इलियाना डिक्रूजसोबत ‘अनफेअर अँड लव्हली’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ यांनी केले आहे. यासोबतच तो महेश मांजरेकर दिग्दर्शित वीर सावरकरांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.