‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी की शादी’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक लव रंजन आपल्या आगामी चित्रपटात नवीन जोडी पडद्यावर आणणार आहे. लव्ह रंजनच्या या चित्रपटातून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग वर्षाच्या सुरुवातीला सुरू होणार होते. पण करोनामुळे ते होऊ शकले नाही. मात्र, आता चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे समजते.
रणबीर आणि श्रद्धा हे नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत करणार आहेत. यानंतर स्पेनमध्ये शूटिंग करण्याचे नियोजन आहे. लव रंजन यांचा हा एक रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट आहे. यात श्रद्धा कपूर एका वेट्रेसची, तर रणबीर कपूर ह लवर बॉयची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाचे शूटिंग सुमारे सहा महिने चालणार असून पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चित्रपट पूर्ण करण्यात येणार आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणबीर कपूर धर्मा प्रोडक्शनच्या ब्रह्मास्त्र मध्ये झळकणार आहे. याशिवाय तो यशराजच्या “शमशेरा’मध्ये काम करत आहे. दुसरीकडे श्रद्धा कपूर अखेरच्या वेळी टायगर श्रॉफसोबत ‘बागी-3’मध्ये झळकली होती.