मुंबई – अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघांचा चित्रपट पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शानाची तारीख पुढे ढकलली आहे. रणबीर- श्रद्धाचा चित्रपट मार्च 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आणि शीर्षकाबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन आणि निर्मिती लव रंजन यांनी केली आहे. लव रंजनने यापूर्वी ‘पंचनामा फ्रेंचाइजी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
लव फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यामध्ये, “रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजनचा पुढील चित्रपट होळी म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी सिनेमा घरांमध्ये बघायला मिळेल!”
या चित्रपटाची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती. करोना महामारीमुळे तर कधी तारखांमुळे चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आधीच बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये रंजन, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि निर्माता बोनी कपूर देखील आहेत, जे रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन पालकांची भूमिका साकारतील.
रणबीर कपूर लव रंजनच्या चित्रपटाव्यतिरिक्त यशराज फिल्म्सच्या शमशेरा आणि अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, श्रद्धा कपूर पंकज पाराशरच्या ‘चालबाज इन लंडन’, अमर कौशिकच्या ‘स्त्री 2’ आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे.