मुंबई – सध्या सोशलवर मराठी वेब सीरिज रानबाजार चांगलीच चर्चेत आली आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सोशलवर रानबाजार वेब सीरिजच्या टिझर नुकताच शेअर केला. या टीझरमधील तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या सुपरबोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित, माधुरी पवार प्रमुख भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
टिझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित चक्क विवस्त्र झाली आहे. तर प्राजक्ता माळीचा प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. सध्या या टिझरमधील तेजस्विनीच्या बोल्ड भूमिकेचे काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी तिला या बोल्ड सीनवरून ट्रोल केले आहे. टिझर तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या दोन्ही टीझरवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
या टिझरला शेअर करतांना तेजस्विनीने पोस्ट लिहिली आहे की,’‘आजवर आपण तिला अनेक भूमिका साकारताना पाहिलं. एक कलाकार म्हणून स्वतःला एका चौकटीत न बांधता आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या संपूर्ण विरोधी भूमिका साकारण्याचा प्रयत्न प्राजक्तानं ‘रानबाजार’मध्ये केलाय.’
View this post on Instagram
तर प्राजक्ताने टिझरला शेअर करतांना पोस्ट लिहिली आहे की,’ प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.. ती पुढे लिहिते की, माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल अभिजित पानसे व मराठीतील सगळ्यात मोठी वेबसिरीज बनवल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटीअक्षय बर्दापूरकर ह्यांचे आभार.’
View this post on Instagram
दरम्यान, अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांनी केली आहे. ‘रानबाजार’ येत्या 20 मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेब सीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.