देहूरोड, (वार्ताहर) – देहू, देहूरोड परीसरात रमजान ईद निमित्त विविध पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठाण, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवांना गळाभेटी घेत आणि शुभेच्छा देत मोठया उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली.
महिनाभर रोजा केल्यानंतर गुरूवारी मुस्लीम बांधवांनी मोठय़ा उत्साहात रमजान ईद साजरी केली. एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. देहूरोड शहरातील इदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाजाचे पठण करण्यात आले.
सकाळी नऊ वाजता पंचक्रोशीतील परीसरातून सामुदायिक नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव इदगाह मैदानावर हजर झाले होते. सुमारे पाच हजार बांधवानी मौलाना जाहीद कास्मी यांच्या मागे सामुदायिक नमाजचे पठण केले.
त्यानंतर ईदच्या शुभेच्छा दिल्या. जामा मस्जिदची ऍडहोप कमिटीच्या वतीने नमाज पठण करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवाना सुविधा पुरविण्यात आल्याची माहिती कमिटीचे अनिस शेख यांनी दिली. अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ईदगाह मैदानावर पोलीस बेदोबस्त तैनात करण्यात आला होता.