पारनेर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते भाऊ गाजरे उपोषणाला बसले असून, उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
या वेळी गाजरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या गाजरे यांनी केल्या आहेत.
या दरम्यान पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, संजय भगत, समीर झगडे, लाभेश औटी, अमोल मापारी, दत्ता आवारी, किसन पठारे, रोहिदास पठारे, विक्रमसिंह कळमकर, दीपक करंजुले, सुग्रीव आवारी, अर्जुन औटी, विनोद मापारी, हिराबाई आवारी यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.