राजगुरूनगर (पुणे) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची सुरुवात राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आली.
राजगुरूनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सुरु झाले. त्याची सुरुवात लहान मुलास जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम चिखलीकर, आरोग्य पर्वेक्षक के. बी. ढाकणे, आरोग्य सहाय्यक बी. आर. भारती आदींसह आरोग्य कर्मचारी, पालक मोठ्या सान्क्येने उपस्थित होते.
खेड तालुक्यात ३ लाख ९४ हजार ५४६ बालकांना पल्स पोलिओ प्रतिबंधात्मक डोस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ डोस देण्यासाठी ११३६ आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अगंणवाडी कर्मचारी यांच्या मदतीने हे लसीकरणास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी, चौकात, बसस्थानक परीसरासह गावे, वाड्यावस्त्यावर जाऊन बालकांचे लसीकरण केले जात आहे. तालुक्यात ४५४ पोलिओ बुथ वर लसीकरण केले जात आहे. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी ९२ पर्यवेक्षकासह, मोबाईल पथके कार्यरत आहेत.