पुणे – पार्किंगमध्ये दारु पित असलेल्या चौघांनी एका वकिलाला रिव्हॉल्वर दाखवत त्याच्या कारची बेसबॉल स्टीकने तोडफोड केली. यानंतर त्याच्या कारमधील 50 हजाराची रोकड असलेली बॅग ुचोरुन नेली. ही घटना मगरपट्टा येथील मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री घडली.याप्रकणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम कांबळे व त्याच्या तीन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ऍड. इजाज मजिद पठाण (34, रा.सातववाडी, हडपसर) यांचे मेगा सेंटरमध्ये कार्यालय आले. ते कार्यालयातील कामकाज संपवून घरी निघाले होते. ते पार्किंगमधील त्यांच्या होंडा अमेज कारजवळ आले असता, कारपुढे आरोपी दारु पित बसले होते. त्यांनी आरोपींना साईडला बसा मला कार काढायची आहे असे सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी बेसबॉल स्टीकने त्यांना मारहाण करुन कारच्या चारही बाजूच्या काचा फोडल्या. कारमध्ये 50 हजाराची रोकड असलेली बॅगही चोरून नेली. जाताना पुन्हा त्यांना रिव्हॉल्वर दाखवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोमण करत आहेत.