मुंबई – सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली.
आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत. राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक झाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात असणार आहे.या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत.