Raj Thackeray : मला मराठा समाजापेक्षा (maratha reservation) कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आज अश्रू अनावर झाले.
पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मान्य केली आहे. ‘तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे’ असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांनीआरोग्य तपासणी करून घेण्यास देखील नकार दिला आहे.
गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये ! #MarathaReservation #MarathaProtest #MaharashtraDharma #HindaviSwarajya #RajThackerayVision pic.twitter.com/B4GeBeFBII
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 30, 2023
दरम्यान, अश्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (raj thackeray) एक पोस्ट शेअर करत ‘जिंकेपर्यंत झुंजत राहू या…’ असं आवाहन केले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये.! असं कॅप्शन देखील या व्हिडिओला दिलं आहे.
या व्हिडिओत राज ठाकरे (raj thackeray) म्हणाले होते की, ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, बुलेट मारायला लावल्या त्या सर्व लोकांना तुम्ही पहिले मराठवाडा बंदी करून टाका.
त्या लोकांना इकडे पाऊल ठेऊ देऊ नका. कधी हे विरोधी पक्षात, ते ते सत्तेत, विरोधी पक्षात आले तर मोर्चा काढतात आणि सत्तेत आले की गोळ्या झाडतात..’ असं राज यांनी म्हटलं होते.