Raj Kundra – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty ) पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणामुळे 19 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याची अधिक चर्चा झाली होती. त्यानंतर आता राज कुंद्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मागील काही दिवसांपासून त्याची बॉलीवूडमधील एंट्रीबाबत चर्चा सुरू होती. अखेर आता राज कुंद्राच्या UT69 या चित्रपटाची घोषणा झाली असून, आज या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर देखील समोर आला आहे. UT69 हा 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
राज कुंद्राच्या आयुष्यातील संघर्ष ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. शिल्पा शेट्टीने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून राज कुंद्राला प्रोत्साहन दिले आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, राज कुंद्रा 2021 साली पोर्नोग्राफी प्रकरणामुळे जाळ्यात अडकला होता, त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा ट्रेलर पाहिल्यानंतर स्पष्ट होतो.
View this post on Instagram
त्याच्यावर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप होता. यानंतर त्याला शिक्षाही झाली आणि त्याला तुरुंगात जावे लागले. याच काळात त्याचे पत्नी शिल्पा शेट्टीसोबतचे नातेही बिघडले. राज कुंद्राला तुरुंगात काय त्रास सहन करावा लागला हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
अटक झाल्यानंतर राज कुंद्राच्या वागण्यातही बदल झालेला दिसत होता. तो जिथे-जिथे जातो तिथे तो मुखवटा घातलेला दिसतो. यावर लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही देतात.
मात्र, आज ट्रेलर प्रदर्शनाच्या दरम्यान राज कुंद्राने आपल्या चेहऱ्यावरील हा मुखवटा देखील हटवला आहे. सध्या सोशल मीडियावर राज कुंद्राचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.