बारामती – आज बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुर्टी येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आणलेल्या शेतमाल शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पावसाच्या पाण्यात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आज बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोरगाव, लोणी भापकर, आंबी, जोगवडी या सर्वच परिसरात मुसळधार पाऊस पडला. मोरगाव सह परिसरातील आज या ढगफुटी सदृश्य झालेले पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. मोरगाव – बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वरील वाहतुक पावसामुळे काही वेळ बंद होती. वाहन चालकांनी जागोजागी वाहने उभी केली होती.
आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुर्टी, सोमेश्वरनगर येथील आठवड्या बाजारातील अनेक शेतकऱ्यांच्या उभे केलेल्या राहुट्या पावसाने उडाल्या. तर मुर्टी येथे शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतमाल त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेला.
येथील आठवडे बाजारासाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात रुलर हट कट्टे गेल्या अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत. बाजार सखल भागामध्ये बाजार भरत आहे. यामुळे या रुरल हट कट्ट्यासाठी लाखो रुपये केलेल्या खर्च वाया गेला आहे. यामुळे रुरल हट कट्टे ठिकाणी बाजार भरविण्याची मागणी भाजपाचे बाळासाहेब बालगुडे यांनी केले आहे.