पुणे – रेल्वेच्या सध्या धावणाऱ्या विशेष प्रवासी गाड्या आता नियमित क्रमांकानुसार धावणार आहेत. त्यासाठी रेल्वेच्या यंत्रणेत बदल करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने रेल्वेची पीआरएस यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे.
नियमित सेवेच्या अनुषंगाने रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. हे सर्व काम रेल्वे तिकिटाशी जोडलेले असल्याने रेल्वेची संपूर्ण पीआरएस यंत्रणा रात्रीच्या वेळेला बंद राहणार आहे.
14 नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजता काम सुरू होणार असून, 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर पुढील सात दिवस दररोज रात्री साडेअकरा ते पहाटे साडेपाच या वेळेत हे काम सुरू असणार आहे.