नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य आले आहे. गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी मिळावी, असे ते म्हणाले. यावर आता पत्रकरांनी जेव्हा राहुल गांधी यांना प्रश्न विचारला त्यावेळेचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.
#WATCH | Congress MP, Rahul Gandhi evading questions on party leader Kapil Sibal’s “Sab Ki Congress…Ghar Ki Congress” remark pic.twitter.com/VscsrDr7D0
— ANI (@ANI) March 15, 2022
सोशलवर व्हायरल व्हिडिओमध्ये आज ज्यावेळी संसदेच्या अधिवेशनासाठी आलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी याच टीकेवर प्रश्न विचारला मात्र राहुल यांनी आपल्या हातातील फोन खिशात ठेवत पत्रकारांकडे एक कटाक्ष टाकला आणि एक शब्दही न बोलताना ते निघून गेले. त्यांनी पत्रकरांच्या प्रश्नावर उत्तर न देता थेथून निघून गेल्याचा विडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सिब्बल म्हणाले होते की,’विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचे आपल्याला आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, “सीडब्ल्यूसीच्या बाहेरही काँग्रेस आहे… कृपया त्यांचे मत ऐका… आमच्यासारखे अनेक नेते आहेत जे सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत, परंतु काँग्रेसचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही CWC मध्ये नसल्यामुळे आम्हाला काही फरक पडतो का? आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्ही सीडब्ल्यूसी मध्ये नाही? देशभरात अनेक काँग्रेसजन आहेत. केरळमधून, आसाममधून, जम्मू-काश्मीरमधून, महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेशातून, गुजरातमधून, जे हा दृष्टिकोन मानत नाहीत.’