मुंबई – प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष या बॉलिवूड चित्रपटाबाबत देशभरात वाद सुरू आहे. पालघरमधील नालासोपारा येथील मल्टिप्लेक्समध्ये काही हिंदू संघटनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्याचा मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी वादही झाला. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये आंदोलकांनी मल्टिप्लेक्समध्ये घुसून चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांना थांबवण्यात आल्याने कार्यकत्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. चित्रपट बंद करण्याची धमकी यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दिली.
व्हिडिओमध्ये ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे आणि आंदोलक म्हणत आहेत, आम्ही हा चित्रपट चालू देणार नाही, आम्हाला फासावर जावं लागलं तरी चालेल असं म्हणत बॉलिवूडचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
#WATCH | Maharashtra | Members of a few Hindu organisations created a ruckus at a multiplex in Nalasopara, Palghar on Sunday, 18th June while the film #Adipurush was being screened there. The protesters stopped the screening of the film, raised slogans and entered into a verbal… pic.twitter.com/b7BBDKPigm
— ANI (@ANI) June 19, 2023
१६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलने होत आहेत. सुरुवातीला लोक याविषयी खूप उत्सुक होते, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, लेखक या सर्वांवरच जोरदार टीका होत आहे.हिंदू महासभेच्या लखनौ युनिटनेही आदिपुरुष चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टीमविरोधात लेखी अर्ज दिला आहे की हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धर्मग्रंथ रामायणाचा अपमान आहे.