लखनौ – स्वतंत्रदेव सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात नव्या प्रदेशाध्यक्षपदाची शर्यत तीव्र झाली आहे. या शर्यतीत ब्राह्मण नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, माजी ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा, कन्नौजचे खासदार व प्रदेश महासचिव सुब्रत पाठक, अलिगडचे खासदार सतीश गौतम, नोएडाचे खासदार डॉ. महेश शर्मा आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय बहादूर पाठक हे मुख्य दावेदार आहेत.
माजी उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा आणि माजी मंत्री श्रीकांत शर्मा यांच्या बाजून सरकार सकारात्मक असल्याचे समोर येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे मागासवर्गियांमधून केंद्रीय मंत्री बीएल वर्मा आणि पंचायत राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दलित वर्गात माजी केंद्रीय मंत्री आणि इटावाचे खासदार रामशंकर कथेरिया हेही या शर्यतीत आहेत. प्रदेश सरचिटणीस अश्विनी त्यागी, अमरपाल मौर्य हेही दावेदार आहेत.