दोहा : युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने शनिवारी ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय कप वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात विक्रमी कामगिरीसह रौप्यपदक पटकावले आहे. १७ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा वेटलिफ्टरने या स्पर्धेत स्नॅचमध्ये १४०, क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६६ असं एकूण ३०६ किलो वजन उचलून युवा विश्व व आशियाई विक्रम मोडित काढत रौप्यपदक पटकावून ही कामगिरी केली आहे.
❄️Hark now hear the lifters sing❄️
Jeremy Lalrinnunga is smashing #Records 'Tis season!@youtholympics #Champion @raltejeremy records PB 306kg lifting 140kg in Snatch and 166kg in Clean & Jerk at the 6th Qatar Cup International Weightlifting Championships in Doha! #Kudos👏🥈 pic.twitter.com/RPoc0yQn9x— Team India (@WeAreTeamIndia) December 21, 2019
जेरेमी याच्या नावे एकूण २७ विक्रम आहेत ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमांचा समावेश आहे. त्याने ३ युवा विश्व, ३ युवा आशियाई आणि ६ राष्ट्रमंडल विक्रमासह १२ आंतरराष्ट्रीय आणि १५ राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले आहेत.
आशियाई भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेरेमीने युवा आणि आशियाई विक्रम मोडत २९७ किलो वजन उचललं होते. तर, याच वर्षी विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याने २९६ किलो वजन उचलत दहावे स्थान पटकावले होते.