नगर – आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नगर शहराच्या नेमाणे इस्टेट येथे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशंभू संभाजी या महानाट्याला शुक्रवारी विक्रमी गर्दीच्या साक्षीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
या वेळी तुमचे सर्व संकल्प फलद्रुप होवोत, तुमच्या हृदयात विजयाची जी इच्छा आहे, ती पुर्ण होवो, सर्वत्र विजयी भव असे सांगत कालीचरण महाराज यांनी आमदार नीलेश लंके यांना कालीचरण महाराज यांनी आशिर्वाद दिले. या महानाट्याच्या शुभारंभास हभप तनपुरे महाराज, मा.आ.दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, दीपक खैरे, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, रोहिदास कर्डिले, राजश्री घुले, अमोल येवले, किरण काळे, संजय झिंजे, प्रशांत गायकवाड, ओमकार सातपुते, ओमकार गारूडकर, शीला शिंदे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, अर्जुन भालेकर, सुदाम पवार, कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी, अॅड. राहुल झावरे, नितीन आडसूळ यांच्यासह लाखो नागरीक यावेळी उपस्थित होते.
कालीचरण महाराज म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील हे महानाट्य आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. आपण खरोखरच सौभग्यशाली लोक आहोत की, असे आमदार आपणास लाभले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कालिका परमेश्वरी चरणी मी प्रार्थना करतो की श्री जगदंबा त्यांनी प्रदिर्घ आयुष्य, परिपुर्ण हास्य, सकल सौभाग्य प्रदान करो, तुमचे सर्व संकल्प फलद्रुप होवोत, विजयाची इच्छा तुमच्या जी -हदयात आहे ती पुर्ण होवो, सर्वत्र विजयी भव. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. तुमच्यासारखे हिंदूवादी लोक राजनीतीमध्ये उच्च पदावर बसले पाहिजेत अशी मी चंडिकेच्या चरणी प्रार्थना करतो.
या महानाटय सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्वयंसेवकांना प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली. त्या स्वयंसेवकांनी चार दिवस त्याच कक्षात आपली जबाबदारी पार पाडण्याच्या सुचना आ. लंके यांनी दिल्या. स्वयंसेवकांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची नोंद घेऊन त्यानंतर त्याची पडताळणीही ते करीत आहेत.
गणांतचे ढोलपथक आकर्षण
या महानाटयाच्या शुभारंभापूर्वी नगर शहरातील गणांत प्रतिष्ठाणच्या ढोलपथकाने उपस्थित प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले. फेटे परीधान केलेले युवक, डौलाने फडकविण्यात येणारा भगवा ध्वज व लयबध्द पध्दतीने करण्यात येणारे ढोल ताशांचे वाद्य काम उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. वेळेअभावी या पथकाला विविध प्रकार मात्र सादर करता आले नाहीत.
डॉ. कोल्हेंची चित्तथरारक घोडेस्वारी
महानाट्यास शोभेच्या दारूच्या आतिषबाजीत प्रारंभ झाल्यानंतर संभाजी महाराजांची भुमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून घोड्यावरून चित्तथराक ऐन्ट्री झाली. प्रकाश योजनेमुळे त्यांची ही घोडेस्वारी प्रेक्षकांना चांगलीच भावली.