मुंबई – अभिनेता अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर ‘पुष्पा 2’ची देखील अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसापूर्वी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा 2’मधील त्याचा पहिला लूक चाहत्यांना दाखविण्यात आला. मात्र आता याच पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे.
‘पुष्पा 2’ मधील फर्स्ट लूकमध्ये अल्लू अर्जुनचे संपूर्ण अंग निळ्या रंगाचे दिसत आहे. तर त्याने गळ्यात लिंबाचा हार, फुलांचा हार, नाकात नथ, कानात मोठे झुमके, ब्लाउज आणि जरीची साडी नेसल्याचे दाखवण्यात आले आहे. अल्लू अर्जुनचे हे रूप आई कालीमातासारखे भासत आहे. यावरून सोशल मीडियावर हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचे म्हणत काही जण संताप व्यक्त करत आहे.
एका नेटिझनने लिहिले की, ‘त्याने देवीचा अवतार धारण केला आहे आणि तिच्या हातात पिस्तूल आहे. तो एका चित्रपटात गुंडाची भूमिका करत आहे, आमच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्याचा अधिकार कोणालाही नाही.’ त्यामुळे ‘पुष्पा 2’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा 2’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये पुष्पाराजच्या शोधात भटकत असलेल्या पोलिसांच्या हाती महिनाभरानंतर त्याचा एक व्हिडीओ लागतो. हा व्हिडीओ जंगलातील आहे. आठ गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत असल्याचं यात दिसतं. जंगलात प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी लावलेल्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात पुष्पा दिसतो. पुष्पाला पाहून वाघही दचकतो.
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमधे सर्वांसाठी हिरो होता. अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती.