पुणे – सर्व मतदान केंद्रांवर आता दोन इव्हीएम

उमेदवार संख्या वाढल्याने निर्णय : 15 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात

पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता शिरूर आणि मावळ मतदारसंघातही 15 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दोन इव्हीएम (इलेक्‍ट्रिक वोटींग मशीन) मशीनची आवश्‍यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त 2 हजार 404 इव्हीएम मशीनची मागणी केली आहे.

इव्हीएम मशीनवर पंधरा उमेदवार आणि एक नोटा असे एकूण 16 बटण असतात. त्यामुळे एका इव्हीएमवर जास्तीत जास्त 15 उमेदवारांची नावे निश्‍चित करता येतात. पुणे लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार, बारामतीमधून 18 उमेदवार, मावळमधून 21 आणि शिरूरमधून 23 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे मतदारसंघात 1 हजार 997 मतदान केंद्र, बारामती मतदारसंघात 2 हजार 372 मतदान केंद्र, शिरूरमध्ये 2 हजार 227 मतदान केंद्र आणि मावळमध्ये 1 हजार 192 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आता दोन इव्हीएम मशीन ठेवले जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडे जादा इव्हीएम मशीन उपलब्ध होते. मात्र, जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढल्याने आता इव्हीएम मशीन अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त मशीनची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.