वाघोली: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर तसेच पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मान्यतेने लोणीकंद पोलीस ठाण्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, तर उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या जागी लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव या तिघांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांची मुंढवा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर यांची गुन्हे शाखेत तर पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.