पुणे – पहिल्याच दिवशी क्वीक रिप्पॉन्स टीमचे प्रात्यक्षिके आणि पोलीस पाईप बँडच्या सुरेख वादनाने मोठ्या दिमाखदार पद्धतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत तरंग-२०२३ला सुरुवात झाली. यामध्ये अमली पदार्थ विराेधी पथकाच्या वतीने पथनाट्यचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्यद्वारे विद्यार्थांना अंमली पदार्थाचा धोका समजून सांगण्यात येत आहे. यावेळी महिला सुरक्षा आणि मुलासांठी तयार करण्यात आलेल्या चित्रफीत दाखवण्यात येत आहे.
पोलीस आणि लोकांमध्ये सौदाहार्यचे वातावरण तयार व्हावे तरंग-२०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ ते २४ डिसेंबर दरम्यान शिवाजीनगर येथील मुख्यालयात सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त प्रवीण पाटील, अपर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, संदीपसिंह गिल्ल, शशिकांत बोराटे, आर. राजा, विक्रांत देशमुख, पोलीस सहआयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर सहअधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य…
तरंग २०२३ मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून सायबर पोलीस. अँटी नार्कोटिक्स, अमली पदार्थ विराेधी पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, डायल ११२, राज्य राखीव बल, संदेश यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली आणि त्यांचे कामकाज याबद्दलची देण्यात येत आहे. शिवाय विज्ञान प्रदर्शन, गुड टच, बॅड टच सारखे प्रबोधनपर आणि ऑर्केस्ट्रा, हास्य कलाकार हे आकर्षण ठरत आहे. खाद्य संस्कृतीचे स्टाल, खादीचे कपडे, दागदागिने आदींचे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.