पुणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच पुण्यात होत आहे. या निमित्त राज ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा केंद्रात हा मेळावा होणार आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेने पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरापासून राज ठाकरे यांनी पुण्यात संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. तर मनसेने उमेदवारांची चाचपणीही केली आहे. मात्र, त्याच वेळी प्रभाग रचना तसेच इतर राजकीय स्थिती पाहता, मनसेने भाजप सोबत जावे असा सूर पक्षातील काही नेते लावत होते. मात्र, स्वत: ठाकरे यांनी “तुम्ही निवडणुकांची तयारी करा. कोणासोबत आघाडी-युती करायची ते मी ठरवेल’ असे सांगत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला होता.
त्यानंतर आता शासनाने निवडणूक अधिकारच आपल्याकडे बदल घेत कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. शिवाय, राज्यातील सत्ताधाऱ्यांचा कारभार, यंत्रणांची छापेमारी याबाबतही पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष काय भूमिका घेणार, याबाबत उत्सूकता आहे.