पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी (दि.24) जाहीर होणार आहे. ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
इयत्ता पाचवीसाठी 3 लाख 75 हजार 223 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 3 लाख 35 हजार 532 जण उपस्थित होते. तर, 39 हजार 691 विद्यार्थी अनुपस्थित होते. इयत्ता आठवीसाठी 2 लाख 33 हजार 165 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 2 लाख 9 हजार 319 जण उपस्थित, तर 23 हजार 846 जण अनुपस्थित होते.