मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जविरोधातील कारवाईने चांगलाच जोर धरला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल 20 कोटी रुपयांचे 4 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन परदेशी महिलांनादेखील अटक करण्यात आली आहे.
कस्टम विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विमानतळावर संबंधित महिलांकडे 20 कोटी रुपयांचे 4 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचा पासपोर्ट आढळून आला आहे.
कस्टम्स विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर 20 कोटी किंमतीचे 4 किलो हेरॉइन ड्रग्ज जप्त केलं आहे. ज्या महिलांकडे ड्रग्ज आढळून आलं त्यांच्याकडे युगांडाचा पासपोर्ट आढळला आहे. अटक केलेल्या महिलांची नावे क्यांगेरा फातुमा आणि तिची मुलगी मान्सिम्बे जयानाह अशी आहेत. त्यांनी जुबा ( सूडान ) ते दुबई आणि दुबई वरुन मुंबई असा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर या महिलांना अटक केल्यांनतर न्यायालयात हजर केले. न्यायालयानं या आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.