पुणे – व्हॉटस अपवरुन झालेल्या ओळखीतून एका विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तीला विवाहसाठी जबरदस्ती करण्यात आली. तीने विवाहास नकार दिल्यावर तीचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर टाकून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज चंद्रकांत माने(20,रा.धनकवडी) याच्यावर आयटी ऍक्ट आणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आंबेगाव पठार येथे रहाणाऱ्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे.
तीने दिलेल्या तक्रारीनूसार तीची आरोपीबरोबर फोनवरुन व व्हॉटसअपवरुन ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने तीला भारती हॉस्पिटल येथे 27 सप्टेंबर रोजी बोलावून घेतले होते. यानंतर तीच्या गळ्याला चाकू लावून नवले ब्रीज येथील सृष्टी लॉज येथे नेले. तीथे तीच्यावर बलात्कार केला. यानंतर तीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरीक संबंध ठेवले.
तीला लग्नाची मागणी घातल्यावर तीने लग्न करण्यास नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने तीचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर टाकले. तसेच तीच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे करत आहेत.