वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे पुणे मनपाच्या वतीने फुलमळारस्त्यावरील पावसाचे पाणी उपसा करण्यास सुरुवात झाली असून या भागातील वाहतूक लवकरच सुरळीत होणार आहे.
वाघोली येथील फुलमळारस्त्यावरील गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साचणारे पाणी काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर साचणारे पाणी काढून नागरिकांना दिलासा दिला आहे.
कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने मनपाच्या वतीने याठिकाणी मड पंप बसवून रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तातडीने मनपाच्या वतीने या ठिकाणी निधी टाकून नागरिकांची कायम स्वरुपी समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.याबाबत मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
फुलमळारस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना ये जा करण्यात अडथळे निर्माण होत असून याबाबतीत निधी टाकून पुणे महानगपालिकेने हा प्रश्न सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन याबाबतीत जास्तीच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे.
रामभाऊ दाभाडे माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे