पुणे – ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडली ‘डॅडस क्रिकेट लीग सीजन-२’. या दोन दिवसीय क्रिकेट लीग चे आयोजन कोंढव्यातील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रिकेट मैदानावर करण्यात आले होते.
या लीग मध्ये ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल व इतर शाळेतील विद्यार्थ्यांचे वडील सहभागी झाले होते. तसेच या मध्ये विशेष करून पुणे पोलीस दलातील अधिकारी पालकांनी देखील सहभाग घेतला होता.
पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेल्या या डॅडस क्रिकेट लीग सीजन-२ मध्ये एकूण ११ टीम सहभागी झाल्या असून सीजन-२ चे उदघाटन पुणे पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक श्री. अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले या वेळी केजेस शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनोद जाधव व ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शकुंतला जयसिंगानी व मुख्याध्यापिका डॉ. रुपाली ढमढेरे या उपस्थित होत्या. या दोन दिवसीय लीग मध्ये एकूण १० मॅच खेळण्यात आल्या.
लीग चा अंतिम सामना पुणे पोलिस कॉप्स व डॅड अवेंजर या दोन टीम मध्ये रंगला असून या सामन्यात पुणे पोलिस कॉप्स या टीमच्या उत्तम खेळीने सामना जिंकला व ते ट्रिनिटी डॅडस क्रिकेट लीग सीजन-२ चे विजेते ठरले. या टीम चे नेतृत्व पुणे पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक श्री. अनिल पाटील करत होते.
या वेळी केजेस शैक्षणिक संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनोद जाधव म्हणाले कि, “ही क्रिकेट लीग जी वडिलांना त्यांच्या मुलांचे प्रतिनिधित्व करण्याची आणि त्यांना अभिमान देण्याची संधी देते. तसेच पालकांच्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट लीग आहे.”
या डॅडस क्रिकेट लीग सीजन-२ चा पारितोषिक वितरण समारोप केजेस शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनोद जाधव, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शकुंतला जयसिंगानी व मुख्याध्यापिका डॉ. रुपाली ढमढेरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी क्रिकेट लीग मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू पालकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.