पुणे- पुणे पोलिसांकडून फसवणूक विरोधात सोशल मीडियावर जनजागृती करणारे ट्विट शेअर करत आहेत या ट्विटवर एक चित्रपटांतील घटना आणि वास्तवात निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल माहिती देत आहे. ज्या त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात घडल्या आहेत.
आज काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘मीम’ व्हायरल (पसरतात) होताना दिसतात. याचाच आधार घेऊन पुणे पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी केलेले ट्विट जोरदार व्हायरल होताना दिसतं आहे.
आपल्या ट्विट अकाउंट वर लिहितात…
“नोकरीची सुवर्णसंधी,घरबसल्या कमवा महिना ५०,००० /-”
‘नोकरीचं गाजर’ दाखवत लुटण्याचा नवीन फंडा –
मैत्रीचा ‘हात’ पुढे करून कोणीही तुमचा ‘घात’ करू शकतो-सावध रहा #Sextortion चे शिकार होऊ नका!
अश्या प्रकारेचे संदेश घेऊन पुणे पोलीस लोकांना जागरूक करताना दिसतं आहेत.