पुणे : रुग्णाची डॉक्‍टरला काठीने मारहाण

उपचार नीट न केल्याने पैसे परत करण्याची मागणी

पुणे – औषधोपचारासाठी खर्च करुनही बरे वाटत नसल्याने एका रुग्णाने डॉक्‍टरकडे उपचाराचे पैसे परत मागितले. मात्र डॉक्‍टरने पैसे देण्यास नकार देताच रुग्णाने त्याच्या क्‍लिनिकची व कारची तोडफोड केली. तसेच डॉक्‍टरला साथीदारांच्या मदतीने काठीने मारहाण केली.

ही घटना नवा बाजार खडकी येथे घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सचिन नावाचा रुग्ण व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी डॉ.रितेश किर्तीकुमार शहा(45,रा.खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार त्यांनी रुग्णावर लघविच्या जागेवर उपचार केले होते.

मात्र औषधोपचार केल्यानंतरही आजार बरा झाला नसल्याचे रुग्णाचे म्हणणे होते. यासाठी खर्च झालेले पैसे रुग्ण परत मागत होता. यासाठी त्याने क्‍लिनिकमध्ये साथीदारांसह घुसून शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. क्‍लिनिकची तोडफोड करुन कारची काचही फोडली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.