पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कसबा विभागाच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रोड, पुणे येथे “मी मराठी – स्वाक्षरी मराठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १२०० अबालवृध्दांनी मराठी स्वाक्षरी करुन उपक्रमात सहभाग घेतला. सदर उपक्रमाचे यंदाचे १३ वे वर्ष होते. तसेच मराठी स्वाक्षरी करणाऱ्यांना मोफत मास्कचे सुध्दा वाटप करण्यात आले.
यावेळी मनसे नेते राजेंद्रबाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, अजय शिंदे उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे, योगेश खैरे, सुशीला नेटके, वनिता वागस्कर, प्रल्हाद गवळी, राकेश क्षीरसागर, संतोष पाटील, जयश्री पाथरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अजय राजवाडे, ऋषिकेश करंदीकर, महेश काबरा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग सचिव वसंत खुटवड आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग आनंद सराफ यांनी केले होते.