पुणे : सेंट मीराज महाविद्यालय गेली दोन वर्षे टेडेक्स हा उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहे.2018 मध्ये एलिफंट इन द रूम आणि 2019 मध्ये हाफ वे देअर अशा शीर्षकांचे दोन कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये मॅजिक ऑफ रिस्कस या विषयावर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रौढ वयोगटातील स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहेत.
जोखीम स्वीकारण्याची किमया साध्य केल्याने जीवनात अनेक मार्ग खुले होतात असा संदेश देणाऱ्या प्रबोधन सत्रांची गुंफण असलेल्या या उपक्रमात वक्ते म्हणून नेहा सहाय, तेजस पाटील, तुषार वर्मा, नेहा पंचामिया, सथ्या नटराजन, रेनिल अब्राहम, तेजस शाम मार्गदर्शन करणार आहेत.
हेल्थ इज युअर व्हिजन फॉर द फ्युचर, रिस्क ऑफ लिविंग इन ॲन इमॅजिनरी वर्ल्ड, फॉलो युवर हार्ट इट ऑफन नोज द रोड , ॲक्शनस स्पीक लाऊडर दयान वर्ड्स, मिनीम्यालीजम, द शो मस्ट गो ऑन, सस्टेनेबल डीझाईन अशी विषय विविधता हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे.
याबरोबरच अथर्व भोमे यांचे गायन व गिटार वादन, श्रेय कपाडिया यांचे कॅजॉन वादन, अपर्णा गांधी यांचे ओडिसी नृत्य हा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी देणारा हा दिवस विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला हमखास पोषक ठरणार आहे.