पुणे – आरटीई अंतर्गत पुणे जिल्ह्यात 935 शाळांमध्ये 15 हजार 596 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 77 हजार 531 अर्ज दाखल झाले होते. 15 हजार 501 बालकांना प्रवेशाची लॉटरी लागली होती. लॉटरीद्वारे 10 हजार 752 बालकांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. आता 4 हजार 844 जागा रिक्त असून यावर प्रतिक्षा यादीतील बालकांना संधी दिली जाणार आहे.
दरम्यान, राज्यात 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. यासाठी 3 लाख 64 हजार 413 पालकांनी आपल्या बालकांचे ऑनलाइन अर्ज भरले. ऑनलाइन लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. या यादीतील बालकांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी 22 मेपर्यंत मुदत दिली होती. मुदतीत 64 हजार 256 बालकांचे प्रवेश निश्चित झाले. आता 37 हजार 590 प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीत 81 हजार 129 बालकांचा समावेश आहे.