पुणे – खडकवासला येथे नदी पात्रात खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात सचिन कापसे (वय 45, रा. शिवणे) याला सत्र न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी जामीन मंजुर केला आहे. परिस्थितीजन्य पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, हा बचाव पक्षचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने निकाल दिला.
कापसे याने ऍड. अभिषेक हरगणे आणि ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांना ऍड. संतोष कचरे, ऍड. विठ्ठल काळे आणि ऍड. भावना भुजबळ यांनी मदत केली. या प्रकरणात कापसेसह पाच जणांवर ऑक्टोबर 2022 मध्ये उत्तमनगर पोलिसात खून, पुरावा नष्ट करणे आणि संगणमतच्या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.