पुणे : मागच्या काही दिवसात पुण्यात कोयता आणि कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पुणे पोलीस मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सोमवारी डहाणूकर कॉलनी येथे रामदासजी कळसकर पथ यांच्या नामफलकासमोर एक लहान झाड वाढल्याने ते नाव झाकले आहे. तेवढे वाढलेले झुडूप व गवत तोडून नाव दिसेल असे सफाई करावी अशी तक्रार कोथरूड – बावधन क्षेत्रिय कार्यालयात आली.
यामुळे या कार्यालयातील दोन सफाई कामगारांनी आरोग्य कोठडीतील कोयते घेऊन डहाणूकर कॉलनीकडे दुचाकीने निघाले. सफाई कर्मचाऱ्यांनी कोयता घेऊन जाऊन ते लहान झाड तोडले. परत इथनं दुचाकीवर मागे बसलेल्या सफाई कर्मचाऱ्याने हातात कोयता धरला. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच्या हातात कोयता असल्याचे पोलीस आयुक्त कार्यलयातील सीसीटीव्ही मध्ये दिसला.
त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयातून सदर कोयता घेऊन चालले असल्याचे व्हि.डी.ओ. फुटेज अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांना पाठवून कोयता घेऊन जाणाऱ्यांना पकडा असे सांगण्यात आले. यानंतर पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, आशिष राठोड व पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी तपास सुरु केला होता.
यानंतर या घटनेची माहिती समजताचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मोकादम वैजीनाथ गायकवाड हे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तो फुटेज पाहून पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरून कोयता घेऊन जाणारे कोयता गँगचे दहशत निर्माण करणारे आरोपी नसून ते महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असल्याचे सांगितले. यानंतर संबंधित महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अलंकार पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. यावेळी कामगार चांगेलच घाबरले होते.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण व आशिष राठोड यांनी सफाई कर्मचाऱ्यांना सांगितले की, तुमचे काम करण्याचे “कोयते, कु-हाडी, गवत काढण्यासाठी वापरात असलेल्या तलवारी उघड्यावर घेऊन जाऊ जात जाऊ नका.
ती हत्यारे झाकून घेऊन जात जा. यामुळे नागरिक भितीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार देणार नाहीत. तसेच महानगरपालिकेने अशा हत्यारांची नोंद त्या त्या पोलीस स्टेशनला द्यावी आणि सदर हत्याराने केलेल्या कामाची नोंद व छाया चित्रे काढून ठेवावी