पुणे – शहरात हुडहुडी वाढत असून, शुक्रवारी (दि. 17) किमान तापमानात आणखीन घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढलेला होता. पहाटे धुके आणि दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा असल्याने थंडी जाणवत आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसानंतर थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, हवामानातील बदलामुळे पुढील 72 तास हवामान कोरडे राहील, रात्री आणि पहाटे धुके पडेल.
तर किमान तापनात एक ते दोन अंशाने घट होईल. त्यामुळे आता थंडीचा जोर वाढू लागला असून, हुडहुडी भरणारी थंडी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.