सोरतापवाडी -नायगाव व पेठगावची पीरसाहेबांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नायगाव येथे शेवटच्या दिवशी आखाड्यामध्ये पैलवानांनी केलेल्या कुस्त्यांनी नायगाव परिसरातील नागरिकांची मने जिंकली. दोन्ही गावात पहिल्या दिवशी पीर साहेबांच्या मंदिरात गलब चढविण्यात आला. दुसऱ्या दिवशी 9 ते 12 यावेळेत छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. तिसऱ्या दिवशी सकाळी व संध्याकाळी लोकनाट्य तमाशा झाला.
यावेळी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळणी पाळणे, मनोरंजनाची विविध साधने, मिठाईची दुकाने यांनी गाव गजबजून गेले होते. यात्रेमध्ये दोन्ही गावच्या उत्सव कमिटीने नियोजनबद्द कार्यक्रम पार पाडले. नायगावच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर व भरगच्च यात्रा भरली. कुस्ती आखाड्यात अंतिम कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी अक्षय गरुड व उपमहाराष्ट्र केसरी मुन्ना झिंझुरके यांच्यामध्ये एक लाख अकरा हजारांची झाली.
ती बरोबरीत सुटली. यावेळी हिंदकेसरी अभिजीत कटके याचा गदा व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राजेंद्र चौधरी, माजी सरपंच गणेश गुलाब चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णाप्पा चौधरी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष नंदू चौधरी, उपाध्यक्ष संजय चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेठ येथे सरपंच तानाजी चौधरी, माजी सरपंच सूरज चौधरी, उत्सव कमिटी अध्यक्ष भीमराव चौधरी, उपाध्यक्ष काळुराम चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तुळशीराम चौधरी, सुजित चौधरी, आदर्श सरपंच महादेव चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.