कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे- महामार्ग हा अपघातग्रस्त बनला आहे. वाहनचालक मोठ्या गतीने गाडी चालवत आहेत तर महामार्ग दुकानदार व व्यावसायिकांच्या दुकानाच्या जवळच खेटून आल्याने दुकानदारांनी त्याचा वापर बोर्ड लावण्यासाठी व वाहन चालकांच्या पार्किंगसाठी करीत आहेत.
दोनच लेन प्रवासासाठी राहत असून यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. याकडे महामार्ग वाहतूक पोलीस व बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करेल काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे-नगर महामार्गावरून प्रवास करताना पायी चालणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पादचारी मार्गावर दुकानदार व व्यावसायिकांकडून बोर्ड,
फ्लेक्सचे अतिक्रमण झाले आहे तर काही जागी पादचारी मार्गच तयार नाहीत. रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सांडपाणी लाइन आहे. त्या अडीच तीन फुटांच्या आहेत. त्याचाच वापर पादचारी करीत आहेत.