जामखेड (प्रतिनिधी) – रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले असुन गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अजित पवार गटाच्या युवती पदाधिकारी संध्या सोनवणे यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन प्रकरण थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कानावर घातले.
यावेळी चाकणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डॉ भास्कर मोरे यांच्या कारवाई करण्याचे आश्वासन देऊन महिला आयोग विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असे सांगितले रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या अन्याया विरोधात गेल्या पाच दिवसापासून विद्यार्थी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.
तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवार पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समिती काल जामखेडला आली होती.
यामध्ये अमोल घोलप, डॉ. संदीप पालवे अध्यक्ष, डॉ. डी. वाय दामा या कमिटीच्या सदस्यांनी जामखेड येथे येत आंदोलन कर्ते विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बरोबर चर्चा केली.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात तीन दिवसापासून विद्यार्थी शैक्षणिक, अर्थिक, शाररीक व माणसीक छळ होत असल्याने आंदोलन चालू होते. गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण घेत असलेल्या एका मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान अजित पवार गटाचा युवती पदाधिकारी संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी डॉ मोरे यांचा कारनामाचा पाढाच विद्यार्थ्यांनी सांगितला यावेळी संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना धिर देत थेट दुरध्वनीवरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना घटनेची माहिती दिली.
यावेळी चाकणकर यांनी डॉ मोरे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे अश्वासन दिले.