सासवड -पुरंदर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, मर्या. सासवड या संस्थेची 2022-23 ते 2027-28 या कालावधीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीकांत श्रीखंडे यांनी जाहीर केले.
पुरंदर तालुका खरेदी-विक्री संघाच्या या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन जागा वाटप करून घेऊन निवडणूक बिनविरोध केली.
उमेदवाराचे नाव सर्वसाधारण मतदार संघ संजय निगडे (मु. पो. गुळुंचे), उल्हासराव जाधव (परिंचे), शांताराम भोराडे (सोमुर्डी), मदनराव चव्हाण (नीरा शिवतक्रार), सागर जगताप (सासवड), मारुती गायकवाड (हिवरे), प्रकाश खेडेकर (गुऱ्होळी), भुषण ताकवले (हरगुडे), विठ्ठल जाधव (दवणेवाडी).
व्यक्तीगत सदस्य अविनाश भारंबे (सासवड), संजय कामथे (शिवरी), ज्ञानेश्वर बाठे (केतकावळे). महिला राखीव मतदारसंघ : शशिकला कोलते (पिसर्वे), संध्या देशपांडे (जेऊर). अनुसूचित जाती/ जमाती राखीव मतदार संघ : हनुमंत जगताप (शिवरी). इतर मागासवर्ग राखीव मतदार संघ : बाजीराव इनामके (सासवड). विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गराखीव मतदार संघ : नामदेव गुलदगड (वीर).