वाघोली -लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे व राज्य उत्पादन शुक्ल विभाग पुणे यांनी संयुक्तपणे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील पेरणे, भावडी व अष्टापूर येथील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या दारूभट्टीवर कारवाई केली. कारवाईदरम्यान भावडी गाव येथील बोरकरमळा येथील 500 लिटरच्या टाक्या फोडून त्यामधील 1500 लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट केले.
तसेच डोंगरगाव ओढ्यालगत सिमेंट विट बांधकाम केलेली टाकी फोडून त्यामधील 1500 लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट करुन आरोपी गणेश धनाजी परदेशी व भारती संजय राजपूत यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 53 हजार रुपये किमतीचे 3000 लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन, हातभट्टी दारू व हातभट्टी बनविण्याचे इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस हवालदार दीपक ठाणगे, बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार संदेश शिवले, अमोल भोसले, नितीन मोरे, बाळासाहेब तनपुरे, सागर पाटील, तुषार पवार, प्रशांत धुमाळ, बेलेकर यांनी केली आहे.